मराठीहिंदीEnglishবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીநாடுదేశం
आमच्यासोबत जाहिरात करा
एक्स्प्लोर
लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू
यूजफुल
होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
मुख्यपृष्ठकरमणूकदोस्त असावा तर असा! जेव्हा अभिनेता जॉर्ज क्लूनीने त्याच्या14 मित्रांना 8-8 कोटींचं गिफ्ट दिलं होतं
hollywood star George Clooney : दोस्त असावा तर असा! जेव्हा जॉर्ज क्लूनी यांनी त्यांच्या 14 मित्रांना 8-8 कोटींचं बक्षीस दिलं होतं
By : जयदीप मेढे|Updated at : 01 Jun 2025 01:46 PM (IST)
hollywood star George Clooney
Source :
ABPLIVE AIhollywood star George Clooney :प्रत्येक सिनेस्टारला यश मिळण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉर्ज क्लूनी याचंही आयुष्य काही वेगळं नव्हतं. त्याने देखील आपल्या जीवनात बरेच चढ-उतार पाहिले. एक काळ असा होता, जेव्हा जॉर्ज क्लूनीला इतरांच्या मदतीची गरज होती. पण यश मिळाल्यानंतर तो त्या लोकांना विसरला नाही, ज्यांनी त्याच्या कठीण काळात साथ दिली होती. 2013 साली त्याने आपल्या मित्रांचा ऋण फेडण्याचा निर्णय घेतला – तोही एक अत्यंत अनोख्या पद्धतीने.
क्लूनीने टूमी ब्रँडचे 14 शानदार सूटकेसेस खरेदी केले आणि प्रत्येक सूटकेसमध्ये एक मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 8.5 कोटी रुपये ठेवले. त्यानंतर त्याने आपल्या 14 जिवलग मित्रांसाठी एक डिनर पार्टीचं आयोजन केलं आणि त्याच पार्टीत हे सरप्राइज दिलं. इतकंच नाही तर या गिफ्टवर लागणारे सर्व टॅक्सेस देखील क्लूनीने स्वतः भरले, जेणेकरून प्रत्येक मित्राला संपूर्ण एक मिलियन डॉलर मिळावेत.
जॉर्ज क्लूनीने एवढं मोठं पाऊल का उचललं?
GQ मासिकाला दिलेल्या एका मुलाखतीत जॉर्ज क्लूनी म्हणाला होता, "जेव्हा मी निर्धन होतो, तेव्हा मी त्यांच्या सोफ्यावर झोपलो होतो. जेव्हा मला पैशांची गरज होती, तेव्हा त्यांनी मला पैसे दिले. जेव्हा मला मदतीची गरज होती, तेव्हा त्यांनी ती दिली. मीही वेळोवेळी त्यांना मदत केली."
तो पुढे म्हणाला, "मी एक नकाशा उचलला आणि त्या सर्व ठिकाणांकडे बोट दाखवलं, जिथे मी त्यांच्यामुळे जाऊ शकलो आणि त्या सर्व गोष्टी पाहिल्या, ज्या मी पाहिल्या. मी विचार केला, ‘अशा लोकांचे उपकार कसे फेडता येतील?’ मग मी ठरवलं – का नाही त्यांना एक मिलियन डॉलर द्यावे?"
क्लूनीच्या त्या 14 मित्रांपैकी एक रँडी गेरबर याने 2017 मध्ये या प्रसंगाची आठवण सांगितली होती. तो म्हणाला, “यातूनच जॉर्ज क्लूनीचा खरा स्वभाव दिसून येतो. मला माहिती आहे की आपण सर्वांनी कठीण काळ अनुभवला आहे, काहीजण अजूनही अनुभवत आहेत. आता तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याची चिंता करण्याची गरज नाही, त्यांच्या शाळेची चिंता नाही, घराच्या हप्त्यांची चिंता नाही.” जॉर्ज क्लूनी हा जगभरात प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने आपल्या व्यक्तिमत्त्वाने आणि अभिनय कौशल्याने कोट्यवधी लोकांना आपले चाहते बनवले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
'किरण त्या अशोक सराफशी दोस्ती कर पन निळू फुल्याच्या नादाला लागू नगं', किरण मानेंची पोस्ट चर्चेत
lagaan फेम अभिनेत्री सध्या कुठे आहे? ग्रेसीने बॉलिवूड का सोडलं? वयाच्या 44 व्या वर्षीही अविवाहित
Published at : 01 Jun 2025 01:46 PM (IST)
Tags :
ENTERTAINMENT HOLLYWOOD #Marathi News George Clooney
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement
${data.labels.total_active_cases}
Active
${data.labels.total_recovered_cases}
Recovered
${data.labels.total_death_cases}
Deaths
${active}
Active
${recovered}
Recovered
${death}
Deaths
महत्त्वाच्या बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
#Air India Plane Crash# Ahmadabad Plane Crash# Vijay Rupani# Sonam raghuwanshi
Advertisement
व्हिडीओ
फोटो गॅलरी
ट्रेडिंग पर्याय
निलेश बुधावले, एबीपी माझाप्रतिनिधी
दोन्हीकडचे कार्यकर्ते प्रचंड आशावादी, पण खरंच होणार का अखंड राष्ट्रवादी? Exclusive Report
Opinion
पर्सनल कॉर्नर
टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Embed widget